• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नियतीचा खेळ आणि संघाची खेळी: एका राजकीय वर्चस्वाची ‘इनसाईड स्टोरी’

Omraje vs. Rana Patil

admin by admin
August 7, 2026
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
१२ वाड्यांचा धनी ते दत्तक पाटील!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It
राजकारणात परिस्थिती कधी आणि कशी बदलेल याचा नेम नसतो. या बदलत्या परिस्थितीमागे जसा नियतीचा खेळ असतो, तशीच नेत्याची स्वतःची ‘राजकीय स्कूल’ (Political Schooling) आणि त्यांची कार्यपद्धतीही तितकीच जबाबदार असते. एका जिल्ह्यातल्या दोन प्रमुख नेत्यांचा—राणा दादा आणि ओमराजे—राजकीय प्रवास पाहिला, तर सत्तेची गुर्मी, बगलबच्च्यांचा विळखा आणि पडद्यामागून चालणारी ‘संघाची’ अदृश्य खेळी यांचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळते.

अपेक्षित सुरुवात आणि चुकीचे सल्ले

राणा दादांचा मूळचा राजकीय पिंड नाही. डॉ. साहेबांच्या कौटुंबिक वारसा पद्धतीने त्यांना अनपेक्षितपणे विधान परिषदेचे सदस्यत्व देऊन राज्यमंत्री केले गेले. त्यावेळी सभागृहाचा अभ्यास तर सोडाच, पण साधी ग्रामपंचायत कशी चालते आणि निवडणूक कशी लढवली जाते, याचा ‘ढ’ सुद्धा त्यांना कळत नव्हता.
नेमक्या याच अज्ञानाचा फायदा त्यांच्या पारंपारिक राजकीय नातेवाईकांनी घेतला. त्यांनी दादांना चुकीची ‘राजकीय शिकवणी’ देण्यास सुरुवात केली. “हऱ्या-नाऱ्या, दादा असं करावं लागतं… तसं केलं की असं होतं” असे सल्ले देत, विरोधकांना लांब ठेवणे, त्यांच्या कामात खोडा घालणे, अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करायला लावणे आणि आपली हुजरेगिरी करणारे लोक नेमणे, अशी नकारात्मक राजकारणाची क्लृप्ती त्यांना शिकवली. दादांनाही वाटले की आपले लोक खूप भन्नाट आहेत आणि ते त्याच मार्गाने वागू लागले.

२००९ चा धक्का आणि वास्तवाची जाणीव

दुसरीकडे, २००९ मध्ये कसलीही राजकीय समज नसताना, लोकांनी स्वतः पदरमोड करत आणि गुलाल उधळत ओमराजेंना आमदार केले. या निवडणुकीत विरोधकांनी राणा दादांना आपली राजकीय ताकद दाखवून दिली. निकालानंतर राणा दादांना पहिल्यांदा जाणवले की, आपल्याला सल्ले देणारे नातेवाईक किती ‘भंगार आणि भामटे’ आहेत.
नंतरच्या काळात दादा पुन्हा विधान परिषदेवर गेले. दोघेही आमदार झाले, पण काम नक्की कसे आणि कुठे करायचे, हे दोघांनाही कळत नव्हते. आमदार म्हणजे फक्त ‘निधी देणे’ एवढेच त्यांना माहीत होते. सभागृहात दोघांनाही प्रश्न मांडण्याची पुरेशी संधी मिळत नव्हती.

२०१२ चा दुष्काळ: राजकारणाला कलाटणी

२०१२ मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाने जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढले. पाण्यासाठी जनतेने दोघांनाही धारेवर धरले. याच काळात ओमराजेंना अधिवेशनात बोलण्याची संधी मिळाली आणि आक्रमक होत त्यांनी चक्क अध्यक्षांचा राजदंड पळवला. मोठा गदारोळ झाला, निलंबन झाले. मात्र, मनसेच्या १३ आमदारांनी (बाळा नांदगावकर वगैरे) सरकारला संविधानिक पाणी पाजले. निलंबन रद्द झाले आणि पाणीपुरवठा मंत्री ढोबळे यांना हटवून दिलीप सोपल यांना जालीम उपाय म्हणून मंत्री करण्यात आले.
इथून राजकीय समीकरणे बदलली. वरिष्ठांच्या सूचनेनुसार सोपलांनी राणा दादांना राजकीय बळ दिले. मतदारसंघात वातावरण बदलले आणि २०१४ मध्ये जनतेने, पक्षाने आणि स्वतःच्या मेहनतीने राणा दादांना पुन्हा आमदार केले.

विरोधातले राजकारण आणि २०१९ चे पक्षांतर

२०१४ मध्ये भाजप-सेनेचे सरकार आल्यामुळे दोघांचीही गोची झाली. पण या काळात ओमराजेंना जनतेच्या सहवासात राहून प्रश्नांचा अभ्यास करण्याची सवय लागली. दुसरीकडे, राणा दादा सभागृहात सरकारवर तुटून पडू लागले, मंत्र्यांना आंदोलनांनी जेरीस आणू लागले. त्यांना सत्तेची ताकद आणि विरोधातले राजकारण कळू लागले होते.
पण सत्तेत राहण्याची लागलेली सवय त्यांना विरोधात बसू देत नव्हती. अखेर, लातूरच्या मार्गे आणि ‘संघा’शी जवळीक साधून, २०१९ ला कमळाचा गमजा गळ्यात घालत राणा दादांनी भाजपमध्ये प्रवेश केला. इकडे ओमराजेंनी पक्षकार्यातून मातोश्रीवर वजन वाढवले. एअर इंडियाच्या मारहाणीच्या प्रकरणामुळे भाजपने ‘रवी सरांना’ (रवींद्र गायकवाड) विरोध केल्याने, ओमराजे दिल्लीत स्वार झाले. विशेष म्हणजे, तिथेही ‘संघा’ने ओमराजेंना छुपे बळ दिले.

संघाचे सूक्ष्म अवलोकन आणि २०२४ चा ‘गेम’

आता संघ दोघांचेही बारकाईने अवलोकन करत होता. संघाला ओमराजे हे ‘हक्काचे’ तर राणा दादा ‘उसने’ वाटू लागले. राणा दादांच्या आजूबाजूला असलेल्या बगलबच्चांमुळे आणि सालगडी, बायको, मुलगा असा ‘परिवार म्हणजेच पार्टी’ या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे संघ नाराज होता. झेडपी (ZP) मध्ये पक्षाचा नियम मोडून अर्चनाताईंना अध्यक्ष केल्याने ही नाराजी शिगेला पोहोचली.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत संघाने उघड उघड असहकार पुकारला आणि परिणामी ओमराजे तब्बल ३.३० लाखांच्या मताधिक्याने पुन्हा निवडून आले. ओमराजे आता कुणाचीही कामे करू लागले होते.

‘पाटील कंपनीला विसरा’ – संघाचा निरोप

संघाने आता टांगा पलटी करण्याची तात्काळ हालचाल सुरू केली. ज्याप्रमाणे लातूर मार्गे राणा दादांना भाजपमध्ये आणले होते, अगदी त्याचप्रमाणे लातूर मार्गे बसवराज पाटील यांना आणून विधान परिषदेचे आमदार करण्याची तजवीज केली. ओमराजेंना कसेही करून मोदी-शहांसोबत बसवायची तयारी सुरू झाली आणि कृतीतून स्पष्ट निरोप दिला गेला: “पाटील कंपनीला आता विसरा.”
थोडक्यात सांगायचे तर:
राणा दादांना बेदखल करण्यामागे संघाने अतिशय शांतपणे आपला खेळ खेळला आहे. जिल्ह्यात सध्या ‘मस्त चाललंय’. भाजपच्या निष्ठावंतांचे जे बंड सध्या दिसत आहे, ते याच बदलत्या राजकीय वाऱ्याचे आणि नियतीच्या खेळाचे द्योतक आहे!
– सोमनाथ तडवळकर, कसबे-तडवळे
Previous Post

घर फिरलं की वासे फिरतात! ओमराजेंची ‘दिल्लीवारी’ अन् राणा पाटलांची ‘दुहेरी कात्री’!

ताज्या बातम्या

१२ वाड्यांचा धनी ते दत्तक पाटील!

नियतीचा खेळ आणि संघाची खेळी: एका राजकीय वर्चस्वाची ‘इनसाईड स्टोरी’

August 7, 2026
पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

घर फिरलं की वासे फिरतात! ओमराजेंची ‘दिल्लीवारी’ अन् राणा पाटलांची ‘दुहेरी कात्री’!

August 7, 2026
पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

August 7, 2026
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

राणेंचा ४ तासांचा ‘लेटमार्क’, बांधावरचे ‘नाट्य’ आणि निष्ठावंतांच्या तोंडाला थेट पाने!

August 7, 2026
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

 राणेंचा ‘लेटमार्क’, दूतांची मनधरणी आणि ठाकुरांचा ‘ताईसाहेबांना’ सणसणीत टोला!

August 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!