नळदुर्ग – नळदुर्ग येथे हुंड्यासाठी छळ केल्याने एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या भावाने पतीसह सासरच्यांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शबाना गौस शेख (वय 28) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. शबाना यांचा विवाह गौस फरीद शेख यांच्याशी झाला होता. विवाहापासूनच गौस शेख, खालेद शेख आणि जरीना शेख हे तिच्या हुंड्यासाठी छळ करत होते. बँकेचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी त्यांनी शबानाला शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून शबाना यांनी 27 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी मयत शबाना यांचे भाऊ समीर लियाकत आवटी (वय 30, रा. गुंजोटी) यांनी नळदुर्ग पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पती गौस शेखसह खालेद शेख आणि जरीना शेख यांच्याविरुद्ध भादंवि कलम 108, 85, 80, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.