नळदुर्ग – पवनचक्कीच्या कामावरून झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना नळदुर्ग तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता मोहन गायकवाड (रा. मुर्टा) यांच्या शेतातील पवनचक्कीच्या कामावर आलेल्या महादेव धनराज रामाने (वय २४ वर्षे, रा. होर्टी) यांना आरोपी चंद्रकांत गायकवाड (रा. मुर्टा) व इतर तीन इसमांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, दगड व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी आरोपींनी पाच कंटेनरच्या समोरील काचांवर दगड मारून नुकसान केले.
याप्रकरणी महादेव रामाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काळलिंबाळा तांड्यात शेतीच्या वादातून मारहाण
मुरुम – काळलिंबाळा तांडा येथे शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणी प्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० ते ८.०० वाजण्याच्या सुमारास समर्थ सलुन दुकानासमोर आरोपी आदित्य दिलीप राठोड, अनिकेत दिलीप राठोड, बलु शंकर राठोड, मनोज सुनिल राठोड, दिलीप रतन राठोड आणि ललीता दिलीप राठोड (सर्व रा. काळलिंबाळा तांडा) यांनी फिर्यादी बाळकृष्ण शिवाजी कंटेकुरे (वय ३३ वर्षे, रा. काळलिंबाळा तांडा) यांचे वडील शिवाजी कंटेकुरे यांना शेतीच्या वादातून मारहाण केली. आरोपींनी गैरकायदेशीर मंडळी जमवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, स्टीलच्या कड्याने व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी बाळकृष्ण कंटेकुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येणेगुर येथे मारहाणीचा प्रकार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुरुम – येणेगुर येथे मरीआई मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास झालेल्या मारहाणीच्या घटनेत मुरुम पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजता आरोपी शंकर विलास कवठे, सुहास विलास कवठे, विठ्ठल महादेव दसमे व इतर एक इसम (सर्व रा. नळवाडी) यांनी फिर्यादी चंद्रशेखर कल्याणी माळी (वय ४६ वर्षे, रा. येणेगुर) यांना “मोटरसायकल हळू चालव” असे म्हणण्यावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व कड्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादीचा साथीदार विकास मधुकर गाडेकर यांनाही चाकूने मारहाण करून जखमी केले.
याप्रकरणी चंद्रशेखर माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.