कळंब – मोहा शिवारातील शेत गट क्रमांक २१२ मध्ये दुपारी २:३० वाजता विमल श्रीधर सावंत (वय ६५) या शेतकऱ्यावर सात जणांनी हल्ला केल्याची घटना घडली. सोयाबीनच्या पिकातून ट्रॅक्टर घेऊन जाण्यावरून झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गणेश बब्रुवान कसबे, रमेश बब्रुवान कसबे, विशाल गौतम कसबे, नवनाथ कसबे, रुक्मीनी बब्रुवान कसबे, वनिता दिलीप कसबे आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी सावंत यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात सावंत जखमी झाले असून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
सावंत यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून १३ सप्टेंबर २०२४ रोजी कळंब पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम १४३, १४७, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.