नळदुर्ग: गंधोरा येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील पाच जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 15 जणांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता नामदेव राठोड (वय 38, रा. गंधोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 18 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता त्यांच्यासह त्यांचे आई-वडील, भाऊ आणि भावजय यांना बाळू नागनाथ पाटील, सतिश शहाजी पाटील, दयानंद सतिश पाटील, नवनाथ शहाजी पाटील, लक्ष्मण नवनाथ पाटील, नागनाथ शहाजी पाटील, संतोष धनाजी मुसळे, हणुमंत जाधव, प्रविण पदम भोसले, कल्याण हनुमंत जाधव, ज्ञानु हनुमंत जाधव (सर्व रा. गंधोरा), सागर मनिष मुळे, बाळू नामदेव मुळे, अमर अनिल मुळे (सर्व रा. सलगरा) यांनी शेतीच्या वादातून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, दगड, काठी आणि कोयत्याने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी भा.न्या.सं.कलम 118(1),74, 115(2),352, 351(2),189(2), 191(2), 191(3), 190, 324(4) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कळंबमध्ये मागील भांडणाचा राग मिटवण्यासाठी तरुणाला मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल
कळंब: मागील भांडणाचा राग मिटवण्यासाठी एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना कळंब शहरातील बाबानगर येथे घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर शिवाजी निकम (वय 38, रा. बाबानगर, कळंब) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 18 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता हरीशचंद्र गुणनवंत कुंभार (रा. डिकसळ, कळंब), बाबासाहेब आश्रुबा प्रभत आणि शोभा बाबासाहेब प्रभत (दोघेही रा. बाबानगर, कळंब) यांनी त्यांना मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली.
याप्रकरणी कळंब पोलिसांनी भा.न्या.सं.कलम 118(1),352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.