कळंब – कळंब शहरात ओमनी गाडीच्या धडकेत दीड वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 18 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8.30 ते 9.00 च्या दरम्यान घडली.
निदा महबूब शेख ( वय दीड वर्ष ) ही मुलगी घरासमोर खेळत असताना एमएच 12 ईजी 1083 क्रमांकाच्या ओमनी गाडीने तिला जोराची धडक दिली. या धडकेत निदा गंभीर जखमी झाली आणि तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मुलीची आई फिर्यादी नामे-नुसरत महेबुब शेख, वय 24 वर्षे, रा. जुना पोलीस स्टेशन शेजारी कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.18.10.2024 दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125(ब), 106(1) सह 184, 134(अ) (ब) मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव पोलिसांची प्रेस नोट: १७ महिन्यांचं मूल १७ वर्षांचं कसं झालं?
तुळजापूरहून ज्योत आणण्यासाठी चालत जाणाऱ्या भाविकाला अज्ञात वाहनाची धडक, मृत्यू
वाशी ) – तुळजापूरहून ज्योत आणण्यासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना 1 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 10 वाजता धुळे-सोलापूर रस्त्यावरील पारगाव शिवारातील मांजरा नदीच्या पुलावर घडली.
अजय अशोक सावंत (वय 24) आणि आण्णासाहेब नावनाथ शेंद्रे (वय 33, रा. रांजणी, ता. गेवराई, जि. बीड) हे दोघे भाविक तुळजापूरहून ज्योत आणण्यासाठी पायी चालत जात असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत अजय सावंत गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर आण्णासाहेब शेंद्रे हे किरकोळ जखमी झाले.
अपघात करून वाहनचालक जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. आण्णासाहेब शेंद्रे यांनी 18 ऑक्टोबर 2024 रोजी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम 281, 125(अ), 125(ब), 106(1) सह 184, 134, 134(अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.